परमहंस योगानंदांचे हिलींग टेक्नीक

परमहंस योगानंद यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये वाहणारी परमेश्वरी शक्ती जागृत करण्यासाठी विशिष्ट तंत्रे (Technique) शिकविली. ही तंत्रे गंभीर आजारांसह शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगांवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी आढळली आहेत.

“The instrument is blessed
by that which flows through it.”Paramhansa Yogananda

योगानंदांचे प्रार्थनेद्वारा हिलींगचे तंत्र (Technique)

प्रार्थना आणि ध्यान करून या तंत्राची तयारी करा, मनाला शांत करा आणि प्रार्थना करा की परमेश्वराची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल . असे अनुभवा कि परमेश्वराचे अस्तित्व हे सगळ्या हिलींग ऊर्जेचा उगम आहे आणि शक्य तितक्या स्पष्टपणे कल्पना करा कि व्यक्ति परमेश्वराच्या आशीर्वादाने धन्य झाली आहे.

योगानंदांन हे , परमेश्वराला एका दैवी आईच्या स्वरूपात प्रार्थना करतात कारण आई हि मातृत्वाच्या दृष्टीने आपल्या सर्वांना प्रिय असते आणि आपण तिची दैवी मुले असून ती आपल्याला दया, करुणा आणि बिनशर्त प्रेम देते.

परमहंस योगानंदांची दोन लहान प्रार्थना तंत्रे

१. पुढील गोष्टी म्हणा : “ हे जगदंबा , तू सर्वव्यापी आहेस. तू तुझ्या मुलांमध्ये व्यापून उरलेली आहेस . तू (व्यक्तीचे नाव ) मध्ये आहेस. तुझी उपस्थिती त्याच्या / तिच्या शरीर, मन आणि आत्म्यात प्रकट कर. ”
नंतर तळवे एकत्रितपणे घासून घ्या, आपले हात वर करा आणि ओम चा ३ वेळा उच्चार करा. असे जोपर्यंत आपल्याला वाटत असेल तोपर्यंत त्या व्यक्तीस हिलींग ऊर्जा पाठवित आहे अशी कल्पना करा .

२. ध्यानानंतर , आपली ऊर्जा हातामध्ये आणा आणि त्वरित हात चोळून त्या व्यक्तीची कल्पना करा. त्या व्यक्तीकडे ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित करून परमेश्वरी आशीर्वाद तिच्या पर्यंत पोहचत आहे असा विचार करा आणि ३ वेळा ओम चा उच्चार आपल्या अंतर्मनात आणि मोठ्याने करा .

 

या आव्हानात्मक काळात जगाला हिलींग पाठविण्यात आमच्यात सामील व्हा. जगाला हिलींग पाठविण्याचे व्हिज्युअलायझेशन (Visualization)

ब्लॉग वाचा