अभ्यासक्रमाबद्दल थोडेसे
“मनुष्य करू शकत असलेली सर्वोच्च कृती म्हणजे ध्यान. मानवी कार्यांपैकी हे एक सर्वात नैसर्गिक आणि फायदेशीर कार्य आहे. ध्यान हे सखोल अध्यात्माचा पाया असून ते आपल्याला अंतरंगातील उच्च चेतनेचा थेट अनुभव देते. ध्यानामुळे आपल्याला आंतरिक शांती, संतुलित जीवन व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते.”परमहंस योगानंद

ज्यांना ध्यान कसे करावे हे शिकण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांसाठी आनंद संघाने हा अभ्यासक्रम बनवला आहे. ह्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही धार्मिक किंवा अध्यात्मिक पार्श्वभूमीचे बंधन नाही. तुम्हाला ध्यानाविषयीची माहिती असो किंवा नसो, हा अभ्यासक्रम तुम्हाला ध्यानाचा नियमित सराव सुरु करण्यामध्ये, तसेच आपल्या शांत, आनंदी व प्रेमळ आत्मस्वरूपाची ओळख करून द्यायला मदत करेल

हा अभ्यासक्रम क्रियायोग शिकण्याच्या मार्गातील चार सत्रांपैकी पहिला आहे.

ध्यान कसे करावे

या अभ्यासक्रमामध्ये ७ चरण असुन ते आपण २ आठवड्यामध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे. .

प्रत्येक चरणामध्ये अभ्यासक्रमाशी संबंधित वाचन साहित्य, मार्गदर्शक व्हिडिओ, ध्यान व दिनचर्या आणि प्रश्नोत्तरे इत्यादींचा समावेश असेल.

हा अभ्यासक्रम अत्यंत व्यापक असून यामध्ये आपण ” ध्यानासाठी कसे बसावे ” इथंपासून ते “आंतरिक शांती व आनंदाचा अनुभव कसा घ्यावा” इथंपर्यंत सर्व काही शिकू शकाल.

आपण यामध्ये काय शिकाल:

  • १. अत्यंत प्रभावशाली परंतु शिकायाला सोपे असे ध्यान तंत्र ज्याचा आपण दैनंदिन जीवनात नियमित सराव करू शकाल.
  • २. ध्यानासाठी उपयुक्त आसनपद्धतींबद्दल सोप्या मार्गदर्शक सूचना.
  • ३. चंचल मनाला स्थिर कसे करावे.
  • ४. दैनंदिन जीवनात शांती आणि आनंदाचे अनुभव कसे घ्यावेत.
  • ५. श्वास आणि मनाचा परस्पर संबंध तसेच एकाग्र मनाची शक्ती यांचा अनुभव.
  • ६. थकवा दूर करून आपली ऊर्जा वाढवण्यासाठीची एक अद्वितीय व्यायाम पद्धती (उर्जीकरणाचे व्यायाम ).

कालावधी: १९ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर
पाठ्यक्रम शुल्क ५०० रु आहे.

नोंदणी करा
ह्या अभ्यासक्रमाची खास वैशिष्ट्ये
  • वैयक्तिक मार्गदर्शन

    आनंद संघाचे प्रतिनिधी तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शना साठी तसेच तांत्रिक गोष्टींमध्ये सल्लागार म्हणून उपलब्ध असतील. म्हणूनच अभ्यासक्रमाच्या कालावधीत तुम्ही आमच्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.

  • प्रशोत्तरे

    आपण विषयातील महत्वाच्या संकल्पना शिकला आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही दिलेली प्रश्नोत्तरे तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे. आमचे प्रतिनिधी तुम्ही पूर्ण केलेल्या प्रश्नोत्तरांचे मूल्यमापन करून आपल्याला अभिप्राय देतील.

  • मोबाइल अ‍ॅपद्वारे सहयोग

    आपल्या सोयीसाठी हा संपूर्ण अभ्यासक्रम मोबाइल अ‍ॅपवर सुद्धा उपलब्ध आहे.

  • वव्हाट्सअँप ग्रुप वरील चर्चा

    आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे वॉट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून मिळवू शकाल

कालावधी: १९ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर
पाठ्यक्रम शुल्क ५०० रु आहे.

नोंदणी करा
अभ्यासक्रमाचे शिक्षक

स्वामी सुवर्णा

स्वामी सुवर्णा दोन दशकांपेक्षा अधिक काळ क्रियावान (क्रिया दीक्षा घेतलेल्या साधक) आहेत. ध्यान मार्गावर प्रगती करू इच्छिणाऱ्या अनेकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परमहंस योगानंदांच्या सुप्रसिद्ध “Autobiography of Yogi”’ या इंग्लिश पुस्तकाचे त्यांनी मराठीत भाषांतर केले आहे. तसेच इतर अनेक आध्यात्मिक पुस्तकांचे भाषांतर करण्याचे त्यांचे काम सुरु आहे. स्वामी सुवर्णा सध्या आनंद संघाच्या पुणे पिंपरी-चिंचवड ध्यान केंद्रामध्ये ध्यानवर्ग घेतात.

अमित पुरोहित

अमित पुरोहित हे योग आणि ध्यानाचे शिक्षक आहेत. त्यांनी न्यूयॉर्कमधील स्टोनी ब्रूक विद्यापीठातून (Stony Brook University) संगणक विज्ञान (Computer Science) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी आयबीएम (IBM) इंडिया बरोबर पाच वर्षांहून अधिक काळ काम केले असून त्यांना युनायटेड स्टेट्स (USA) आणि कॅनडामध्ये (Canada) काम करण्याचा अनुभवही आहे. श्री. अमित हे २०१० पासून आनंद संघाचे सक्रिय सदस्य आहेत.

आमचे प्रेरणा स्थान : परमहंस योगानंद

परमहंस योगानंद (१८९३ – १९५२)

परमहंस योगानंदाचा जन्म इ.स. १८९३ मध्ये झाला. अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करणारे ते भारतातील पहिले योग गुरु होते.

योगानंद इ.स. १९२० मध्ये अमेरिकेत दाखल झाले आणि, ज्याला त्यांनी आपली “आध्यात्मिक मोहिम” म्हणून संबोधले त्या कार्यासाठी, त्यांनी अमेरिकेत सर्वत्र प्रवास केला.

योगानंदाचा पाश्चात्य संस्कृतीवरील प्रारंभिक प्रभाव खरोखरच नेत्रदीपक होता. परंतु त्यांचा आध्यात्मिक वारसा त्याहूनही मोठा व चिरस्थायी आहे. इ. स. १९४६ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या “Autobiography of Yogi” या यांच्या आत्मचरित्रातून पाश्चिमात्य देशांमध्ये आध्यात्मिक क्रांती घडून येण्यास मदत झाली. डझनाहून अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेली ही आत्मकथा आजपर्यंतचे सर्वाधिक खपाचे अभिजात अध्यात्मिक पुस्तक आहे. सांप्रदायिक बंधन नसलेला आत्म-साक्षात्काराचा वैश्विक आध्यात्मिक मार्ग, हे योगानंदांनी पाश्चिमात्य देशांना दिलेले चिरस्थायी योगदान आहे.

योगानंदांनी आत्म-साक्षात्कारासाठी आपल्या अनुयायांना क्रिया योगाच्या प्राचीन तंत्राची दीक्षा दिली, ज्याला त्यांनी “ईश्वरापर्यंत पोहचण्याचा जेट विमान मार्ग ” म्हणले आहे.

आनंद संघाविषयी थोडेसे

स्वामी क्रियानन्द (१९२६-२०१३)

“आनंद संघ” ही एक जागतिक अध्यात्मिक संस्था असून, ती परमहंस योगानंदाच्या शिकवणुकीवर आधारित आहे

स्वामी क्रियानंद हे परमहंस योगानंदांचे शिष्य आणि आनंद संघाचे संस्थापक होते. इ. स. १९४८ मध्ये, वयाच्या २२व्या वर्षी “सत्य” शोधण्याच्या त्यांच्या अनिवार आध्यात्मिक इच्छेने त्यांना परमहंस योगानंदाचे “Autobiography of Yogi ” हे पुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले. पुस्तक वाचल्यानंतर क्रियानंदांनी पुस्तकाचे लेखक परमहंस योगानंद हेच आपले गुरु असल्याचे ओळखले आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन गुरूच्या शिकवणुकीचा अभ्यास व प्रसार करण्यासाठीच व्यतीत करण्याचे ठरवले. त्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच भेटीत योगानंदांनी क्रियानंदांना आपले शिष्य म्हणून स्विकारले.

स्वामी क्रियानंदांनी इ. स. १९६८ मध्ये आनंद संघाची स्थापना केली. त्यांनी सुमारे १५० पुस्तके लिहिली असून ४०० हून अधिक गीते आणि भजने रचली आहेत.
आज आनंद संघ ही अनेक देशांमध्ये कार्यरत असलेली एक जागतिक संस्था बनली आहे आणि हजारो साधकांना वेगवेगळ्या समुदाय आणि ध्यान केंद्रांमार्फत, तसेच ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे सेवा देत आहे.

 
अभ्यासक्रमाचे स्वरूप
ध्यानाचे फायदे
ध्यान काय आहे
चेतना आणि तिचे प्रकार
अभ्यासक्रमाचे फायदे
  • “हॉंग सॉ” नावाचे एक सोपे परंतु शक्तिशाली चिंतन तंत्र.
  • प्राणशक्तीच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी
  • प्राणशक्ती संप्रेषणात्मक व्यायाम.
  • 2 आठवड्यात ७ धडे.
  • नियमित ध्यान विकसित करण्यास मदत करा.
  • आपले आध्यात्मिक प्रश्न सल्लागाराद्वारे सोडवा.

कालावधी: १९ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर
पाठ्यक्रम शुल्क ५०० रु आहे.

नोंदणी करा